नी-नयति या क्रियापदाचे  नेणे, वाहून नेणे, मार्गदर्शन करणे, नायक होणे (टु लीड, टु कॅरी, टु गाइड , टु गवर्न) असे अनेक अर्थ सांगितले आहेत. नायक म्हणजे नेता म्हणजे लीडर. नीता म्हणजे नेलेली. उपनीत म्हणजे उपनयन करून दूर नेलेला. परिणीता म्हणजे विवाह केलेली (विवाह करून फारच दूर नेलेली). उपनयन म्हणजे मुंज तर परिणयन म्हणजे विवाह. गुजरातीत परणेली म्हणजे लग्न झालेली.
नम्-नमति/ते म्हणजे वाकणे, वंदन करणे.(to bow, to salute,to bend ). परि+नम् म्हणजे खाली वाकणे, वाढ होणे, जीर्ण/म्हातारे होणे, बदल पावणे. परिणत म्हनजे जुना, पक्व, पूर्ण वाढ झालेला, पालतलेला, रूपांतर झालेला. परिणाम म्हणजे effect, पण खरे तर बदल. आपण जेव्हा परिणामांती असे म्हणतो तेव्हा आपल्याला 'बदल झाल्यानंतर' असे म्हणायचे असते. म्हणून परिणाम म्हणजे result, end, फळ, शेवट, अंत सुद्धा.
प्रणीत, प्रणत,प्रणति, प्रणिधि हे शब्द आणखी वेगळे.
एखाद्या शब्दाला प्रचलित अर्थ कसे प्राप्त झाले असावेत हे पहाणे मनोरंजक ठरू शकते.