तुम्हाला टाटा उद्योगसमूहाला चांगला अनुभव आला, पण अश्या कंपन्या अपवाद असतात. मी हिंदुस्तान लिव्हर मध्ये १० वर्षे नोकरी केल्यावर राजीनामा देऊन  २००१ च्या मे महिन्यात अमेरिकेत आलो. तिथे मागच्या वर्षीचा मॅनेजमेंट बोनस पुढच्या वर्षी मे महिन्यात देण्याची प्रथा आहे. इथे आल्यावर काही दिवसांनी माझ्या वडिलांना कंपनीकडून "ड्यूज" मिळाले, त्यामध्ये २००० सालाचा बोनस नव्हता. वास्तविक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २००० असे पूर्ण वर्ष काम केले असल्याने तो मला तो मिळायला हवा होता. त्याबद्दल कंपनीच्या पे-रोलमधले अधिकारी, माझे वरिष्ठ, आमच्या रिसर्च डायरेक्टरचा सेक्रेटरी अश्या सर्व लोकांना लिहून पाहिले, कोणाचाही प्रतिसाद नाही. शेवटी आमच्या चेअरमनला ईमेल लिहिली. त्याने एच. आर. डायरेक्टरला त्याबद्दल बघायला सांगितले. एच. आर. डायरेक्टरची मला ईमेल आली की "कंपनीचे धोरण असे की तुम्ही पूर्ण वर्ष नोकरी करूनही  बोनसवाटपाच्या दिवशी जर  तुम्ही जर पे-रोलवर नसाल तर  तुम्हाला बोनस मिळणार नाही. " आपल्या नशीबात बोनस नाही असे समजून गप्प राहिलो. एक दोन महिन्यांनंतर चेअरमनच्या सेक्रेटरीची ईमेल आली "तुमच्यापैकी काही लोकांनी विनंती केल्यावरून कंपनी तुम्हाला गेल्या वर्षीचा बोनस देत आहे."  खरे तर वाजवी मागणी, पण तीही चेअरमनपर्यंत गेल्याशिवाय मान्य झाली नाही. बासष्ट हजार रूपये १३ वर्षांपूर्वी बरेच होते.