इच्छामरण कायदेशीर झाले तर काही लोकांचे प्रश्न सुटतील.
अजीबात नाही. इच्छामरण फक्त दोन गटां करता विचाराधीन आहे. एक, जे लोक दीर्घ काळा पासून बेशुद्धावस्थेत आहेत, कोणतीही जाणीव नसलेले, ज्याला इंग्रजीत "वेजिटेबल" स्थिती म्हणतात अश्या स्थीतीत आहेत व त्यातून बाहेर येण्याची काहीही आशा नाही; व ते लोक जे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, अतीव वेदनेत आहेत, व दोन-चार महिन्यात मरण अटळ आहेच.
जे लोक केवळ अति वार्ध्यक्याने किंवा अर्धंगवायू इत्यादीने ग्रस्त आहेत, पण निकट भविश्यात मृत्यू अटळ नाही, त्यांच्या करता इच्छामरण ना विचाराधीन आहे, व मला तसे सुचवायचे पण नव्हते. अजिबात नाही. या लोकां करता काही तरी अशी सोय असायला हवी जी रुग्णालय व घर याच्या मधली स्थिती असेल. जिथे त्यांना गरज असेल त्या प्रमाणे आंघोळ घालणे, जेवण भरवणे, कपडे बदलणे इत्यादी केले जाईल, जुजबी त्रास (सर्दी-खोकला वगैरे) करता डॉक्टर असेल, पण काही ट्रीटमेंट अशी नसेल, व हे दीर्घ काल वास्तव्या करता, खर तर अंता पर्यंत, असेल, ज्याने त्यांच्या पुढच्या पिढीचे जीवन जरा सोपे होईल. सध्या पण अश्या सोयी आहेत, पण त्या फार महाग आहेत. ३५,००० रु महिना एका व्यक्ती करता.