राष्ट्रीय संस्थासंघटनांनी 'जी' हा प्रत्यय मुख्यतः हिंदीमधे वापरला असावा असे वाटते.
मराठी प्रांती पूर्वी शहाजी, शिवाजी, संभाजी, तानाजी, संताजी, धनाजी, बाळाजी, बाजी, दत्ताजी इत्यादी लोक पराक्रम करून गेले असले तरी आता हिंदीच्या प्रभावाखाली मराठीत होणारा 'जी'चा वापर केविलवाणा वाटतो हे खरे. मनोगतावर वाढून ठेवलेलं चविष्ट पक्वान्नांचं सुग्रास जेवण जेवताना मधेच हा 'जी'चा खडा एक नकोशी वेदना देऊन जातो.
आपला
(निजभारतीय) प्रवासी