मराठी प्रेमीजी समरप्रसंग फारच व्यक्तिगत होता म्हणून लिहिण्याचे टाळले पण आता तुम्ही विचारतच आहात म्हणून लिहितो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
आम्ही पुण्याहून मुंबई विमानतलावर जाण्यासाठी केके (K.K.Travels) ला प्रत्येकी ८५० म्हणजे दोघांचे १७०० रु.दिले होते त्याप्रमाणे परतताना चौघांचे ३४०० रु.पडायला हवे होते.पण आमच्या चिरंजीवांशी बोलणे झाले तेव्हां त्यानी त्याला ३५०० रु.पडतील असे सांगितले होते व तसे त्याने मला फोनवर सांगितले होते.खरे तर त्यांनी १०० रु.ज्यादा घ्यायचे कारणच नव्हते तरीही मी तशी मासिक तयारी ठेवली होती.पण आमच्या घरापाशी सोडल्यावर चालकाने आमच्याकडे ४००० रु.ची मागणी केली. मी त्याला ३५०० रु.ठरले होते असे सांगितल्यावर ते तो काही ऐकायला तयार नव्हता.तेव्हां मुलगा घरात नसल्यामुळे मी त्याला फोन केला,तो केकेला फोन करू लागला.हा सगळा प्रकार आमच्या घरापुढेच चालू होता व त्यात थोडाफार वेळ जाणार हे उघडच होते,पण आता कर्णेबाईंना इतकी घाई झाली होती की "आता मला लवकर जाऊद्या काय ज्यादा पैसे द्यायचे ते मी देते"असा तगादा त्यांनी लावला.त्यांच्या मनस्थितीचा विचार करून माझ्या नेहमीच्या पद्धतीने"अहो बाई आमच्यामुळे तुम्ही दोन तास लवकर आला आहात तर आता आमच्यासाठी दहा पंधरा मिनिटे द्यायला काय हरकत आहे ?" असा रोख ठोक सवाल करू शकलो असतो ते मी टाळले.तिकडे माझ्या मुलाचा केकेला फोन लागेना.शेवटी मी नाइलाजाने व कर्णेबाईंच्या कटकटीला कंटाळून चालकाला ४००० रु.देऊन टाकले.कर्णॅबाईंनी मेहरबान होऊन त्यांच्या हिश्श्याचे १००० रु.माझ्या हातावर ठेऊन त्या निघून गेल्या.पाचच मिनिटांनी मुलाचा फोन आला,"बाबा ड्रायव्हरला पैसे दिले का?" अर्थातच मी दिल्याचे त्याच्या कानावर घातले,त्यावर,"इतकी घाई कशाला केली केके चा प्रतिनिधी ड्रायव्हरशी बोलून त्याला ३५०० रु.च घ्यायला सांगायला तयार झाला होता." शेवटी परोपकार केल्याबद्दल ५०० रु.चा फटका आपल्याला बसला असे मी मनाचे समाधान करून घेतले.
तिकडे आमचे मेव्हणे दोन तास झाले तरी अले नाहीत,त्यामुळे काळजीने आम्ही फोन केला तेव्हां ते आमच्या नव्या फ्लॅटपासून दीड किलोमीटर अंतरावरच उतरले असे समजले कारण मागून येणाऱ्या गाडीच्या चालकाला रस्ता माहीत नव्ह्ता किंवा त्या कच्च्या रस्त्यावरून यायला तो तयार नव्हता.एकूण काय की उपकारही करण्याची हल्ली सोय राहिली नाही हेच खरे!