छ. शिवाजी महाराज स्थानकात जखमी झालेल्यांपैकी अनेकांचा रुग्णालयांचा खर्च टाटाने केला. त्यासाठी टाटाने २६ लाखांपेक्षा जास्त खर्च केला. हे लोक कुठल्याही तऱ्हेने टाटाशी संबंधित नव्हते. केवळ सामाजिक जाणीव म्हणून हे टाटाने केले. ताज मध्ये त्या दिवशी कामावर असलेल्या फक्त काही आठवडेच नोकरी झालेल्यांना टाटाने पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेले, सुटी, वैद्यकीय सेवा वगैरे सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
याउलट मी काम करीत असलेल्या कार्यालयातील एका अभियंत्याला एका विमा कंपनीचा वाईट अनुभव आला. र्ग्णालयातील उपचाराचा खर्च वैद्यकीय विमा कंपनीने थातुरमातुर कारणे देत, तीही चुकीची, नाकारला होता. शेवटी ऑमड्यूजमन कडे नाहीतर कोर्टात जाण्याची कायदेशीर कारवाई करीन असे लेखी बजावल्यावरच त्या कंपनीने तो खर्च दिला.
जे आरडी चे चरित्र वाचल्यावर टाटा कुटुंब किती देशभक्त आहे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात टाटांचा वाटा किती याचा प्र्र्रत्यय येतो.
तुमच्या धाग्यात प्रतिसादातून अशा गोष्टी मांडाव्याशा वाटल्या. धन्यवाद.