रंजक लेख. खूऽऽप नवीन (की जुने? ) शब्द माहीत झाले. आभार.
थोडेफार शब्द माहीत होते. उदा. : पाखडणे, घोळणे, चोचवणे, अवसडणे, (हे सर्व केले आहे/ करत आहे. )
आम्ही भात किरविजणे म्हणतो. आधण आलेल्या पाण्यात भात करण्यासाठी तांदूळ घालणे याला आम्ही वैरणे म्हणतो. कोकणातून देशावर किंवा देशातून कोकणात जाताना हा बदल झाला असेल. निवगरी, सांदण हे कोकणस्थांच्या घरात पडल्यामुळे माहीत झाले. पोपी, पाट, पन्हळ, बाव हे शब्द देशावरही वापरतात. मंत्रचळेपणा हा शब्द तर आमच्या आधीच्या पिढीतल्या बायका अजूनही वापरतात,
पऱ्ह्या, पष्टाळणे, रातांबा, डोण, साकव हे शब्द गो.नी.दांडेकरांच्या ’पडघवली’मुळे माहीत झाले होते.
जमेल तेव्हा आमच्याही गावाकडचे शब्द देण्याचा मानस आहे! इतरांनीही असे करावे ही विनंती.