काही शब्द माहीत होते, काही नव्याने कळले.
हल्ली विळी वापरत नसले तरी रुंद पात्याच्या सुरीवर मी काकडी चोचावूनच कोशिंबिरीला वापरते.
तांदळाच्या पिठात भरडलेले जिरे आणि मीठ घालून त्याचे भज्यांसारखे पीठ भिजवून ते तेलाचा हात लावलेल्या पळसाच्या पानावर चमच्याने पसरवायचे
आणि त्यावर पळसाचे दुसरे पान ठेवून ही पाने दोन्ही बाजूंनी तव्यावर भाजायची. मग मधली पानगी अलगद सोडवून त्यावर कच्चे तेल वा तूप घालून लोणच्याबरोबर खायची.
माझी आजी मधल्यावेळच्या खाण्यासाठी अशा पानग्या करीत असे.
हे आजीकडून ऐकलेले आणखी काही शब्द -
बळद - धान्य साठविण्यासाठीची भिंतीमागील जागा.
वरवंडी - खिडकीखालची स्लॅब, ज्यावर खिडकीतून उतरता येईल अशी.
वटकन - पलंगावर लहान मुलाला झोपवल्यास ते लोळत खाली पडू नये म्हणून एखादे पांघरूण वा उशी गादीच्या खाली सारून गादीचा
तो भाग उंच करणे म्हणजे वटकन लावणे.