दुष्यंताने ठरवून शकुंतलेला सोडली होती असा उल्लेख आहे का? शकुंतलेला मिळालेल्या शापाचा तो परिणाम होता ना?
- हो, कथेनुसार शापाचा परिणाम होता, परंतु महाभारतातील , रामायणातील, पुराणांतील कथांवरील हे शाप व/ वा वरदानांचे थर दूर केल्यास मानवी स्वभावांचे व पर्यायाने मानवी कृतींमागील कार्यकारणभावांचे निरभ्र दर्शन घडेल असे वाटते.