विशेषकरून खालील द्विपदी.
उभयतांचा कोंडमारा होत आहे
अप्सरेच्या सोबतीला संत आहे
श्रीराम - सीता आणि दुष्यंत - शकुंतला यांच्यात कुठलेच साम्य नाही. म्हणजे ज्याप्रमाणे रामाने सीतेचा त्याग केला तसे दुष्यंत - शकुंतलेमध्ये झालेले नाही. बऱ्याच पूर्वी पं. महादेवशास्त्री जोशींचा लेख वाचला त्यात त्यांनी असे म्हटले होते की जुन्या काळच्या प्रेमकथांमध्ये खरे प्रेम दिसत नाही, एक नल - दमयंतीचा अपवाद वगळता. दुष्यंत - शकुंतलेमध्ये जे काही झाले तो शुद्ध देवाण - घेवाणीचा व्यवहार होता, प्रेम अजिबात नव्हते. जे झाले ते असे.
दुष्यंत राजा शिकार करताना कण्व मुनींच्या आश्रमात आला. कण्व मुनी आश्रमात नव्हते. तिथे त्याने शकुंतलेला पाहिले, त्यानंतर त्याला तिचा उपभोग घेण्याची इच्छा झाली. तिने त्याला एकच अट घातली की यातून जन्मलेला मुलगा तुझा वारसदार असेल. तिने कसले आढेवेढेसुद्धा घेतले नाहीत. तिची विनंती मान्य करून दुष्यंताने तिचा उपभोग घेतला. त्यानंतर तो निघून गेला. तिचा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत शकुंतलेला दुष्यंताला भेटायची इच्छाही झाली नाही. एकदम १८ वर्षांच्या मुलाला घेऊन ती दुष्यंतासमोर उभी राहिली आणि त्याला दिलेल्या वचनाची आठवण देऊन मुलाला राजपुत्र म्हणून घोषित करावे अशी विनंती करू लागली.
अशी मूळ महाभारतातली कथा आहे. त्यामुळे दुष्यंताने शकुंतलेला खरेच "सोडले" का? मुळात हा त्या काळचा "वन नाईट स्टँड" सारखा प्रकार होता. रूढ अर्थाने लग्न (जरी दुष्यंत राजा आपण गांधर्व विवाह करू म्हणाला तरीही ) नव्हते, प्रेम नव्हते, चार क्षणांचा उपभोग संपल्यावर दोघांचीही एकमेकांशी कसलीही बांधिलकी नव्हती. त्यामुळे दुष्यंताने शकुंतलेला "सोडले" असे म्हणणे पटत नाही.