केलेलं वर्णन योग्यच आहे. "भाषा मराठीसी ... ‌ सात्त्विकाचे लेणे लेवविले. " एकदम बरोबर. त्या काळातही मराठिची गळचेपी होत असावी . कारण संस्कृत व इतर अरबी , फारसी सारख्या भाषा यांचं प्राबल्य असावे. म्हणून तर सामान्य जनांच्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाण केले. 
आत्ता असते तर ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले असते. पण ते ज्ञानेश्वर होते , नुसते  लेखक नव्हते . ते "सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ,
जयाजयौ " असे असल्याने पुरस्कार वगैरे गौण गोष्टी होत. आपण फार खालच्या पातळीवर आहोत हेच खरं.