आवडली.
एक घडलेला प्रसंग मित्राने सांगितलेला... आळंदीच्या प्रवासात दोघे जण शेजारी बसलेले. त्यातला एक जण धिप्पाड, सहा-एक फूट उंचीचा, काळा कभिन्न, (माजी) जवान. त्या दोघांचे साहजिकच संतवाङ्मयाबद्दल चाललेले. दुस्ररा इसम सहज बोलला... 'पण कित्येक वेळा ज्ञानेश्वरीतील शब्द कळत नाहीत.... ' जवानाने चमकून पाहिले. भावाकुल होत म्हणाला, 'अरे, माऊली ती! बालकाला आईचे शब्द समजत नसले तरी तिची दृष्टी सर्व काही सांगत असते. माऊलीकडे बालक होऊन पाहा. काही अडणार नाही! '