मी आज हा लेख वाचला ,.....
तर ही अशी श्रद्धांजली....
रसिक मनाची रसिका ग
म्हणे उंच माझा झोका ग
गिरीश जो शिखरी बसला ग
प्रपंच करण्या गवसला ग
वाटे हलक फुलक व्हावे
गम्मत-जम्मत करावी
आनंदवन गाठावे
व्हाईट-लिली तोडावी
लाटरीन झाली' मालामाल विकली '
भूलाभूलैयात अडकली , ''बंदिनी ''ठरली
बालमनास दिले नक्षत्रांचे देणे
अतुल बालाकांसंगे आले देहभान विसरणे
काही घडलय, बिघडलय काही
पण त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही
विजयाने धुंद, रसिकांच्या मनाचा घेत ठाव
कोठे धावली भरधाव?..नाही ठावं !
जेथे असशील तेथे शांती सुख अनुभवावं ....