गंगाधरजी. जे आहे, ते भगवंताचे देणे आहे. आपण निमित्तमात्र इतकेच!
     तुकोबारायांच्या १०८ नामपर अभंगांवर अशाच प्रकारे झालेले लेखन 'तुका म्हणे नाम' या नावाच्या ग्रंथरूपाने नुकतेच छापले गेले आहे. (पृष्ठे ४२२, मूल्य रु. २५०/-  मात्र.) पुण्यातील रसिक  साहित्य दुकानात सध्या उपलब्ध आहे. त्या पूर्वी श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावरील लिखाण 'नाम-नवनीत ' नावाने प्रकाशित झाले. तो ग्रंथ ११०० पानी तीन भागात असून मूल्य रु. ३००/- आहे. तोही रसिक  साहित्य दुकानात उपलब्ध आहे.
     या लेखनकार्यामागे 'ज्येष्ठ-राज'  टिटवाळा (जि. ठाणे) या ज्येष्ठ नागरिक संस्थेला आर्थिक लाभ होत राहावा, अशी इच्छा आहे. असो.