परिणती म्हणजे परिणाम हे योग्य आहे, पण परिणिती असा शब्द असण्याचे काही कारण नाही.  विवाह या अर्थाचे परिणय आणि परिणयन हे दोन शब्द आहेत. परिणिती या शब्दाचा विवाह हा अर्थ संभवत नाही. परिणीत म्हणजे अर्थात विवाहित, परिणीता म्हणजे विवाहिता.

आणखी एक, संस्कृतमध्ये परिणतीमधली ती ऱ्हस्व आहे.  त्यामुळे परिणति+वाद हा समास होताना' 'ती'   ऱ्हस्वच  राहून परिणतिवाद असा शब्द तयार होईल.

परिणिती किंवा परिणीती हे एखाद्या सिनेमा नटीचे नाव असावे, असे वाटते.  त्या शब्दाचा अर्थ विवाह असा होण्याची शक्यता अधिकच धूसर आहे.  कोणत्याही मुलीचे नाव  लग्न, विवाह किंवा घटस्फोट असल्या अर्थाचे  कसे असेल?