शाळेत आमच्या मराठीच्या पाठ्य पुस्तकात एक फार छान कविता होती.  फक्त पहिल्या चार ओळीच आठवतात. कुणी पूर्ण कविता सांगू शकेल? कविता अशी आहे :-
मूल पाठिवर विणीत चटई
पेंगत पेंगत बाई जाई
रेड्यापाठी फुटकी भाणडी
त्यावर फडफड करी कोंबडी

कवितेचा विषय सहज समजला असेल. या कवितेचा कवी बहुधा विदर्भातील असावा.