माझी ९वी, १०वी आणि ११वी (मॅटिक) अशी तीन वर्षे मध्यप्रदेशात गेली. ही कविता बहुतेक ९वीच्या पुस्तकात असावी.
त्या पुस्तकातली आणखी एक कविता मला अर्धवट आठवते आहे. तीही कुणाला संपूर्ण माहीत असेल तर सांगावे. कविता अशी :
हें नव्हें आजचें कैक युगें बा झालींही रीत तयाची अशीच चालत आलीकाल बा चित्रमय होतें हें जग असेंआजला चित्रमयही हैं ऐसेंराहील उद्याही चित्रमयही तै तैसें ही पुरे खिन्नता मुळी न शोभे तुज रे । ।
ते दादा माधव लाल बाल की पाल ते सुरेंद्र मेथा वाच्छा बसू गोपालहे लाल भरतभूमिचे आजचे सर्वथा सकल कल्याणी ते तसे । ।
परी एक तयांतिल सकल वंद्य लोकांसी जाहला, कथा बा तुळिता काय तयासी?
कुणाला माहीत आहे ही कविता ? मी वर लिहिलेले शब्द थोडेफार चुकले असतील, पण भावार्थ तोच.