धन्यवाद.

आपले बरोबर व त्यांचे चूक असा दावा मूळ प्रस्तावात नाही.   
प्रतिसादकांना चुकून तसे वाटले असावे. मुद्दा केवळ विसंगती व विसंगतीमुळे होणारे घोळ यासंदर्भात होता. 

प्रतिसादकांच्या उद्बोधक उत्तरांवरून  प्रस्तावाशी संबंधित काही कंगोरे मला समजले. भाषाविषयक ज्ञानात भर पडली.  

ईस्ट इंडिया कंपनीचे महाराष्ट्रात उतरलेले  भाषापंडित आणि दक्षिणी भारतात गेलेले पंडित वेगवेगळे होते. त्यांनी त्या त्या प्रांतात शब्द जसे उच्चारले जातात तसे जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कसे व्यक्त करता येतील हे पाहून शब्दांची इग्रजी स्पेलिंगे ठरवली. -- बोधप्रद. प्रस्तावातील 'दाक्षिणात्यांनी असे का केले ?  तसे करण्याची परवानगी त्यांना कोणी दिली?' या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे कदाचित् शुध्द मराठींच्या या माहितीत असावीत. धन्यवाद.

तिसरा प्रश्नयुक्त मुद्दा पुनश्च उपस्थित करतो.  
१. महाराष्ट्राीय नावाचे स्पेलिंग चुकल्याने झालेले घोळ माझ्या माहितीत आहेत. शेंडे ऐवजी शिंदे,  अजेय ऐवजी अजय असे होऊन पुढे माहितीत एकवाक्यता न राहिल्याचे  किस्से आहेत. दाक्षिणात्यांची स्पेलिंग रचना असाच घोळ घालू शकते, असे मला नेहमी वाटत आलेले आहे. तसे होणे अगदी स्वाभाविक आहे आणि  हे आतापर्यंत कसे झाले नाही, याचे आश्चर्य वाटते.  
       आश्चर्य जरी वाटत असले तरी तसे झाले नसेल तर समाधानच आहे. 

ह्या व्यतिरिक्त-
२.  थ लिहिण्याची सोय नाही पण थ चा उच्चार त्यांना करता येतो. उच्चार करता येत असेल तर लिहिण्याचीही सोय करण्यास हरकत नव्हती. 
३. मूळ शब्द माहीत असला की इंग्रजीत लिहिलेली तामीळ नावे बिनचूक वाचता येतात-  काही प्रमाणात सहमत. ज्यांना सराव आहे त्यांना वाचता येतात. सराव नसलेले लोक सरळ गुरुनाधम, जयाप्रधा असे म्हणत असल्याचे ऐकले आहे. त्यावरून किरकोळ चकमकी उडाल्याचे पाहिले आहे. लिहिण्यात घोळ होत नाही असे मानले तरी संवादात विसंवाद येतो. 
४.  नाव, वडिलांचे नाव  व आडनाव असे रकाने बहुतेक कागदपत्रांमध्ये असतात. ते रकाने दाक्षिणात्य  कसे भरतात, याचाही खुलासा येथील तज्ज्ञ प्रतिसादकांपैकी कोणी केल्यास आभारी राहीन.
५.  भारतात स्पेलिंगबाबतीत यापुढील काळात एकवाक्यता येऊ शकते का?