मी वरती विचारणा केलेल्या कविता  शोधून नक्की कुणीतरी मला मिळवून देतील, पण त्या काहीशा अप्रसिद्ध असल्याने  सापडणे जरासे अवघड आहे.  म्हणून आमच्या पाठ्यपुस्तकातील आणखी एक कविता मिळवून देण्याची विनंती करीत आहे.

मूळ संस्कृत कवितेची वामन पंडिताने केलेली ही समश्लोकी आहे. मनोगताच्या ज्या सभासदाला, 'नवनीत', 'सुभाषितरत्नागर' किंवा 'समग्र वामन पंडित' यांतले एखादे पुस्तक मिळण्यासारखे असेल, किंवा ज्याला ही 'समश्लोकी' मुखोद्गत असेल त्याला नक्की संपूर्ण कविता सांगता येईल.

काश्मिरी पंडित वल्लभदेव याच्या  'सुभाषितावलिः'  या ग्रंथात संग्रहित केलेले मूळ संस्कृत काव्य असे :

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापितो मस्तके
वाञ्छन्‌ देशमनातपं विधिवशात्तालस्य मूलं गतः |
तत्राप्यस्य महाफलेन पतता भग्‍नं सशब्दं शिरः
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापदां भाजनम्‌ ||

या काव्याचे मराठीत रूपांतर करून  वामन पंडिताने रचलेल्या समश्लोकीचा अर्धा भाग :-

खल्वाट चंडकिरणे अतितप्त झाला
छायार्त तो ताल तरु समीप गेला

शब्द नक्की हेच असतील असे नाही, पण काहीसे असेच.  कुणी समस्यापूर्ती करेल?