२००० साली व्यायाम करताना माझ्या दंडामध्ये रक्ताची गुठळी (डीप व्हेन थ्राँबॉसिस) झाली होती. ती औषध देऊन नाहीशी केल्यावर काही महिने रक्त पातळ व्हायचे औषध सुरू होते. नेमका त्याच काळात ऍपेंडिक्सचा त्रास सुरू झाला. डॉक्टरला रक्त पातळ व्हायचे औषध सुरू आहे, रक्तस्राव थांबणार नाही असे सांगूनही त्यांनी ऑपरेशन केले, बरेच रक्त जाऊन प्राणावरच बेतले होते. सुदैवाने वेळीच मोठ्या रुग्णालयात हलवले, योग्य ते उपचार झाले आणि वाचलो.