महेश आणि विनायक :- धुळ्याहून पुण्याला (निगडी येथे माझे घर आहे) जाण्याकरिता बरेच पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत परंतु एकही फारसा चांगला नाहीये.
- धुळे - मालेगाव - मनमाड - कोपरगाव - संगमनेर - नाशिक फाटा - निगडी :- या मार्गावर धुळे ते मालेगाव या दरम्यान दुभाजक आहे आणि रस्ताही उत्तम आहे, परंतु ४५ किमी करिता ११५ रुपये पथकर भरावा लागतो. पुढे मालेगाव मनमाड कोपरगाव पर्यंत रस्ता दुभाजक नाही पण रस्ता रूंद आणि येवल्यापर्यंत खड्डे रहित आहे. येवला ते कोपरगाव पर्यंत रहदारी घनता जास्त आणि रस्त्यात खड्डेदेखील आहेत. कोपरगांव ते संगमनेर रस्ता दुभाजक नाही. रस्ता अरूंद परंतु रहदारी अतिशय कमी आहे. संगमनेर ते राजगुरूनगर रस्तादुभाजक नाही, रस्ता वाईट आणि जास्त रहदारी आहे. राजगुरूनगर पासून पुढे रस्तादुभाजक आहे आणि रस्ताही बरा आहे, परंतुर रहदारी अजुनच जास्त आहे. हा मार्ग सर्वात जवळचा म्हणजे ३२५ किमी आहे.
- वर दिलेल्या मार्गाने जाताना कोपरगाव नंतर संगमनेर ला जाण्याऐवजी सरळ अहमदनगरला जाऊन पुण्यास जाता येते. शिर्डी कोलार पर्यंत बरेच खड्डे आहेत पुढे मार्ग बरा आहे आणि रस्ता दुभाजक देखील आहे. अहमदनगर पासून पुढे राज्य महामार्ग असून तो उत्तम आहे. अंतर थोडे जास्त आहे. ३९० किमी.
- धुळ्याहून औरंगाबाद च्या दिशेने निघाल्यास रस्ता बरा आहे, खड्डे कमी प्रमाणात आहेत परंतु रस्ता दुभाजक नाही आणि कन्नड घाट अतिशय जोखमीचा आहे. औरंगाबादपासून पुण्यापार्यंत अतिउत्तम रस्ता आहे. रस्त्यावर दुभाजक देखील आहे. हा मार्ग सर्वात जास्त अंतराचा आहे - ४१० किमी.
वर दिलेल्या पर्यायांपैकी एकही फारसा समाधानकारक नसल्याने मी आलटून पालटून सर्वच मार्गांचा अवलंब करतो. शिवाय प्रत्येक मार्गावर अध्येमध्ये माझ्या नातेवाईकांची घरे आहेत. त्यांनाही भेटून जाता येते.
कुशाग्र आणि मीरा फाटक :- शुभेच्छांकरिता धन्यवाद.
विनायक :- चौदा वर्षांपूर्वी तुम्ही एकाच वेळी दोन शारिरीक व्याधींचा सामना केलात आणि प्राणांतिक संकटाला परतवून लावलेत याबद्दल तुमचे अभिनंदन!