श आणि ष हे स्वतंत्र उच्चार फक्त मराठी विद्वानांनाच करता येतात हा एक गैरसमज आहे. अनेक मराठी वक्ते, गायक, नाटक-सिनेमांतील नट-नट्या, राजकारणी हे 'ष'चा व्यवस्थित उच्चार करतात. दूरदर्शनवरच्या निवेदिका चारुशीला पटवर्धन आणि भक्ती बर्वे या त्यांच्या ''ष'च्या उच्चारांसाठी प्रसिद्ध होत्या. आजही सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांचे 'ष' ऐकावेत.
ट, ठ, ड, ढ, ण, या अक्षरांना 'श' लागत नाही, तेथे 'ष'च लागतो. ज्याला न आणि ण हे उच्चार योग्य करता येतात असा महाराष्ट्रातील अगदी खेडूतही गोश्ट, कश्ट, काश्ठ, उश्ण असे अशुद्ध उच्चार करू शकणार नाही. ते तसे उच्चार करणे फार कष्टाचे आहे. नैसर्गिक उच्चार करताना 'गोष्ट, कष्ट, काष्ठ आणि उष्ण असेच उच्चार तोंडातून बाहेर पडतील.
असे असले तरी, नको तेथे 'ष'चा उच्चार करणारे अनेक वक्ते आहेत. प्रश्न या शब्दाचा प्रष्ण हा चुकीचा उच्चार करणारे भरपूर सापडतील.
कोश आणि कोष हे शब्द मराठीत भिन्न अर्थांनी वापरले जातात. अतिविचारी माणूस स्वतःला ज्या कोषात गुंडाळून घेतो त्याला कोश म्हणणारे थोडेच.
संस्कृतातून आलेले शब्दच नव्हेत तर, फारशीतून आलेला पोशाक हा स्त्रीलिंगी शब्द आणि अरबीतून आलेला शौक हा पुल्लिंगी शब्द मराठीत अनुक्रमे पोषाख आणि षौक असे लिहिले आणि उच्चारले जातात. त्यावरून बनलेले पोषाखी, षौकीन हे शब्दही 'ष' वापरून लिहिले जातात. फक्त संस्कृत शब्दांमध्येच 'ष' येतो हे बरोबर नाही.
शेष, विशेष, शोष, शिष्ट, शिरीष, शर्मिष्ठा, शिक्षण, शंखपुष्पी, शतायुषी, शिष्य, शीर्ष, शीतोष्ण, शुष्क, षष्ठी आदी शब्दांत 'ष' नसेल तर ते शब्द कसे दिसतील?
या श-ष संबंधी जसा काही लोकांच्या मनात आकस आहे, तसा काही लोकांच्या मनांत ल-ळ बद्दल आहे. मराठीत दोन 'ल' हवेत कशाला असे एकदा माडगूळकरांना विचारले तेव्हा त्यांनी