दररोजच्या बोलण्यात येणारे काही चित्पावनी बोलीतले शब्द :
असस=आहेस
असां=आहे
असलो=होतो
असे=आहे
आसा=आहेत
इलास=आलांस
करूक=करायला
कापूचे=कापायचे
कामेरी=कामकरी स्त्री
कितां=काय?
कें=कुठें
केंथून=कुठून
गोरवां ढोरवां=गुरेढोरें
जपाचां=जपायला
जपान=जपून
ठेयलांसे=ठेवलें आहे
तां=तें
पाडूंचे=पाडायचे
बोड्यो=मुलगा
में=मीं
म्हणीं=म्हणून
रात्रीचां=रात्रीचें
रेहे=राहा
लागतां=लागतें
वावरचे=वावरते
सस, सां, सलो, से, असस, असां, असलो, असे - ही सर्व असणे या क्रियापदाची विविधपुरुषी रूपे.
हकडा तकडा=इकडे तिकडे
हठा=येथे
हाडां==आणा,
वगैरे.