चारुशीला पटवर्धन यांचे श आणि ष चे उच्चार मलाही अजून आठवत आहेत. "त्याच्या ह्या शतकात एक षटकारही होता. " असे त्यांनी म्हटलेले मला आठवते आहे.
--
ष हे अक्षर ट वर्गातील आहे. म्हणजे त्याचा उच्चार करताना ट, ठ प्रमाणेच जीभ टाळ्याला लावावी लागते.
---
मनोगतावरच एका चर्चेत कोणीतरी हल्ली ष कोण वापरतो? असे म्हटले होते. त्याला मी उत्तर दिले होते की वापरतात आणि चुकीचे वापरतात. एका दुकानावर पाटी होती. "एक गादी घेणाऱ्यास दोन उषा फुकट. "