वरचे तीनही प्रतिसाद वाचून मजा आली. श-ष-स ची गल्लत करून आणि/किंवा त्यांऐवजी ह किंवा ख उच्चारून अनेक गमती होतात.
अरबीतून आलेले आणि मराठीत 'ष' वापरून लिहिलेले किंवा उच्चारले जाणारे आणखी शब्द आठवले.
मिसकीन किंवा मिसकील म्हणजे अरबी भाषेत, बाहेरून दिसायला साधा भोळा पण पोटातून लबाड. या शब्दावरून मराठीत आलेले मिस्कील आणि मिश्कील हे शब्द. त्यांतला मिश्कील हा हमखास मिष्कील असा लिहिला जातो.
आणखे एक शब्द मुश्किल. हाही मूळ अरबी. मराठीत नेहमीच मुष्कील असा लिहितात. (मनोगताचा शुद्धलेखनसुधारक 'मुश्कील' हा शब्द टंकलेखित करूच देत नाही. शब्द लिहून स्पेसबार दाबला की 'श्क'चा 'ष्क' होतो. पूर्वी मनोगतावरचा शुद्धिचिकित्सक बंद करून हवे तसे अशुद्ध टंकता यायचे, आता का जमत नाही, समजत नाही! मोठ्या मुष्किलीने मुश्कील टाईप केला. हुश्श ! )