कुशान् लाति‍ इति कुशलः । संस्कृत शब्द 'कुशल' हा शब्द कसा बनला ?  कुश नावाचे अणकुचीदार गवत तोडून आणण्याचे अवघड काम करणारा तो कुशल.. (जसे० प्रवीण म्हणजे, प्रगतः वीणायाम् यः । वीणा वाजवण्यात पटाईत, असा जो तो.)

पण या संस्कृत कुशलचा मराठी कुशलशी काही संबंध नसावा. हा मराठी कुशल शब्द फार्सी 'खुश' आणि अरबी 'हाल' यांया संयोगाने  'खुशहाल ' हा जो फार्सी शब्द बनला त्यापासून, खुश->खुष-> खुशहाल->खुषाल-> कुशल या मार्गाने आला असावा. (नक्की माहीत नाही! )

क्षमापासून म्हणजे खमापासून खम्मा कसा बनला ? माहीत नाही. कदाचित क्षमा->क्षेम->कुशल, तसे खमा->खम्मा->क्षेम असो, असा काहीसा प्रवास असावा. खमा हे नाम आहे, तर खम्मा हे अव्यय.

मनोगतावर डॉट जे ही एक खास सोय आहे. कोणत्याही अक्षरानंतर डॉट आणि जे या कळी दाबल्या की ते टंकित अक्षर अविकृत राहते, आणि नंतरचे टंकता येते.  येते. उदा० अ डॉट जे यू= अ‍ु.  तसे क+डॉट जे+ष=क्‍ष. .....  अद्वैतुल्लाखान