उपरोध छान जमला आहे.
मला एक छोट्या गोष्टीविषयी शंका आहे. 'टाटा' चा मूळ गुजराती उच्चार 'ताता'च असावा. तात म्हणजे वडीलधारा. पारसी लोक त्यांच्या जिभेच्या पर्शिअन वळणानुसार थोडे वेगळे उच्चार करतात. दरवाजा चा डरवाजा, ण चा ड आणि शेवटी र वगैरे. आपणो चे आपरो, पडी गयो चे परी गयो, बायडीचे बायरी, तेथीज ऐवजी टेठीज, तारी पासे ऐवजी टारी पासे, दारा वाडिया ऐवजी डारा वारिया  वगैरे. तसेच 'ताता'चे 'टाटा' झाले असावे. गुजराती वर्तमानपत्रांत 'ताता' लिहितात. हे  'ट' हा आपल्या मराठीतल्याप्रमाणे कठोर नसतो. आणि ड हा नुक्तावाल्या ड सारखा.