दिवाळी आणि होळी ह्या आपल्या सणा/उत्सवांविषयी माहिती परदेशी व्यक्तींना देण्याचा प्रसंग येतो तेव्हा मी दिवा'ळी' आणि हो'ळी' असा आपण करतो तसा उच्चार करतो. त्यावर 'ळ'च्या उच्चाराबद्दल कुतूहल निर्माण होते, त्यावर माहिती देताना "मी, माझे कुटुंबीय आणि ही भाषा बोलणारे इतर सुमारे अकरा कोटी लोक हे शब्द दिवाळी, होळी असेच उच्चारतात.",  अशी माहितीही देतो. त्यानंतर ते उच्चार उत्साहाने माझ्याकडून शिकून घेऊन तसे यशस्वीरीत्या त्यांनी उच्चारल्याचे मला अनुभव आहेत.