मराठीतले दोन च वेगवेगळे कसे उच्चारायचे ते काही गुजराथी विद्यार्थ्यांना समजावून देताना हे माझ्या लक्षात आले. नीट सांगितले आणि समजून घेतले की ते जमते. . . . दोन च चा हा प्रयोग मी परदेशी सहकार्यांसोबतही यशस्वीरीत्या केलेला आहे. . . . . . दिवाळी आणि होळी . . . त्यानंतर . . . यशस्वीरीत्या त्यांनी उच्चारल्याचे मला अनुभव आहेत.
मान्य. पण यात कुठेच दोन च किंवा ळ ची गरज आहे का, या वर भाष्य नाही. पर-भाषेतील नवीन उच्चार शिकता येतील का, आणि ते उच्चार असण्याच मुळातच गरज आहे का, या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत.
मराठीतली अक्षरे कमी करायची की वाढवायची ? हा प्रतिसाद प्रे. शुद्ध यांनी जरी उपहासात्मक म्हणून लिहिला असला तरी त्यातील काही मुद्दे मला अजिबात उपहासात्मक वाटत नाहीत. जसे ऌ आणि ॡ या दोघांची गरज नाही.
आपल्यापैकी अनेकांना वस्तू टाकवत नाहीत व गरज नसलेल्या वस्तू घरात जमवून ठेवण्याची सवय असते. मला आहे. मग दोन-तीन वर्षातून आम्ही एकदा अडगळ-सफ़ाइ अभियान करतो. यात नियम असा असतो कि (मौल्यवान वस्तू सोडून) जी वस्तू तीन वर्षात एकदा पण वापरली गेली नाही, किंवा ती वस्तू आपल्या कडे आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो होतो, त्याची गरज नाही हे मान्य करावे व ती घरा बाहेर करावी. हा नियम भाषेला पण लागू करण्यास हरकत नाही. शाळेत मुळाक्षरे शिकल्या नंतर आज पर्यंत म्हणजे जवळ पास साठ वर्षे एवढ्या कालावधीत मी ऌ ॡ ञ यातील काहीही एकदा पण वापरले नाहीत. माझ्या ओळखीत, गोतावळ्यात पण कोणी वापरला असेल असे मला वाटत नाही. मी रोज दोन मराठी वर्तमान पत्रे वाचतो, पण यात मला कुठेही ऌ ॡ ञ वाचल्याचे आठवत नाही. अगदी प्रामाणिक पणे सांगायचे तर प्रे. शुद्ध यांचा प्रतिसाद वाचला तेंव्हा अशी अक्षरे असतात याची आठवण झाली अन्यथा त्यांचे अस्तित्व पण मी विसरून गेलो होतो. तेंव्हा ही अक्षरे बाद करण्यास माझा पूर्ण पाठींबा आहे .
कॢप्ती हा शब्द क्लुप्ती असा लिहिला की काम भागले. अगदी निश्चितच भागते. शाळेत टिळक यांनी संत हा शब्द तीन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, संत, सन्त, व सन् त असा लिहिला व प्रत्येक प्रकार बरोबर आहे असा आग्रह धरला वगैरे गोष्ट सगळ्यांना आठवतच असेल. देवनागरी लिपी रोमन पेक्षा चांगली कशी यात एक महत्वाचा मुद्दा असा कि देवनागरी फोनेटिक आहे, म्हणजे दृश्य चिन्ह व त्याचा उच्चार यात "एकास-एक" नाते आहे. गणितात याला one to one correspondence असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही चिन्हाचा एकच उच्चार, व कोणत्याही उच्चार करता एकच चिन्ह. रोमन लिपीत असे "एकास-एक" नाते नाही. C या अक्षरचा उच्चार 'स' किंवा 'क' या पैकी काहीही होऊ शकतो, वगैरे.
पण देवनागरीत जरी "एकास-एक" नाते रोमन पेक्ष खूपच जास्त असले, तरी ते १००% नाही, जसे एकाच उच्चारा करता संत, सन्त, व सन् त अशी तीन चिन्हे. (किंवा फोनेटिक पण १००% नाही, जसे वाकबगार याचा उच्चार "वाक् बगार" असा करायचा, का "वाकब् गार" असा करायचा हे लिपीतून उघड होत नाही.) तेंव्हा कोणी वापरत नसलेली फालतू चिन्हे बाद करून व इतर काही सुधारणा करून लिपी जर जास्त फोनेटिक करता आली तर त्याचे स्वागतच व्हावे. मात्र हे करताना भाषे वर प्रेम असणारे, म्हणजे साहित्यिक शब्द-प्रभू वगैरे, यांना विचारू नये. कारण ते भाषे कडे त्रयस्थ नजरेने पाहू शकत नाहीत. जसे, सर्जन चे रुग्णावर प्रेम असू नये. तरच तो त्रयस्थ पणे त्याचे पोट फाडून त्यातील निकामी अवयव काढून टाकू शकतो, तसे.