मराठी-संस्कृतात  य, व, र. ल हे अर्धस्वर समजले गेले आहेत, कारण त्यांया उच्चारांचा अनुक्रमे इ, उ, ऋ, आणि ऌ या स्वरांशी संबंध आहे. जर य-व-र-ल हवे असतील तर इ-उ-ऋ-ऌ असणारच. भाषेत ऌचा एकही शब्द नसला चालेल, तरी निदान तत्त्वतः ऌकार हा उच्चार राहिलाच पाहिजे. 

इंग्रजीत वाय्, डब्ल्यू, आर्,  एल् आणि एच् हे अर्धस्वर आहेत.  म्हणजे ही व्यंजने आहेतच, पण यांचा स्वरांसारखाही उपयोग होतो.

Say, Dawn, Arm, Palm, Allah या शब्दांत वाय्, डब्ल्यू, आर्,  एल् आणि एच् या व्यंजनांचा स्वरांसारखा उपयोग केला गेला आहे.

इंग्रजीतली ऍश(æ) आणि ईग्यूल किंवा ईथेल (रूनिक मुळाक्षर ओडल) (œ) ही मुळाक्षरे आजही शब्दकोशातल्या शब्दांमध्ये आणि विशेषतः उच्चारकोशात आढळतात.  केवळ टंकलेखनाच्या सोयीसाठी ही अक्षरे ae किंवा oe अशी तोडून लिहिली गेली तरी या अक्षरांचा उपयोग संपला आहे असे नाही.

या अक्षरांशिवाय 'अ' असा उच्चार असलेले श्वा ə〉हे अक्षर, क्रा‍उझेक असलेले इंग्रजीतले ए हे अक्षर (Å), ही दोन्ही अजून बाद झालेली नाहीत.  सूक्ष्म प्रकाशतरंगांची लांबी मोजणारे  अँगस्ट्रॉम हे माप लिहिण्यासाठी ए-क्राउ‍झेक  लागणारच लागणार.

 इंग्रजीतील फसाड् हा शब्द लिहिण्यासाठी (
Ç) -सीच्या खाली एक छोटा एस, सेडिला, काढल्याशिवाय तो शब्द लिहिता येत नाही.

 ही यादी अजूंन खूप मोठी करता येईल.  पण यावरून एक समजते की जगातील इंग्रजी ही प्रमुख भाषा आपली ऐतिहासिक परंपरा असलेली मुळाक्षरे वापरणे बंद करत नाही, तर आपण ऌ का बंद करावा.

ञ हा स्वतंत्र उच्चार आहे हे वर आलेच आहे.  मेघदूत या संस्कृत खंडकाव्यात  याचना या अर्थी याच्ञा हा शब्द आला आहे. तो दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने लिहिता येणार नाही.