र हा अर्धस्वर कसा व त्याचा ऋ या स्वराशी संबंध
आहे म्हणजे काय ते मला समजले नाही. खर तर ऋ हा स्वर आहे हेच मला माहीत नव्हते. असो. मला काय समजले किंवा नाही, ते महत्त्वाचे नाही. ञ हा स्वतंत्र उच्चार आहे . . . मेघदूत . . . या संस्कृत खंडकाव्यात याचना या अर्थी
याच्ञा हा शब्द आला आहे. भाषेत ऌचा एकही शब्द नसला चालेल, तरी निदान तत्त्वतः ऌकार हा उच्चार राहिलाच पाहिजे. हे मात्र समजले. आणखीन काही वर्षां नंतर त्याचा नेमका उच्चार काय हे ही कोणाला माहीत नसेल. कृ चा उच्चार मराठीत क्रू असा करतात तर हिंदीत (लिपी देवनागरीच) क्री असा करतात. काही हजार वर्षां पूर्वी हे अक्षर जन्माला घातले तेव्हां त्याचा काय उच्चार होता हे कळण्याचा आता काहीच मार्ग नाही. तीच गत ञ ऌ वगैरेची होईल. त्यांचा उच्चार काय या बाबत वाद विवाद असतील. चघळायला काही तरी पहिजे ना.
माझे जरा चुकलेच. मुंबईत सध्या हेरिटेज इमारती हा वाद सुरू आहे ना. अमूक एक वर्षां पेक्षा जुन्या इमारती, त्या राहायला उपयोगाच्या नाहीत, उलट धोकादायक आहेत, सध्या तिथे कोणी राहत नाही. पण म्हणून त्या पाडून टाकता येत नाहीत. आणि एकेकाळी तिथे कोणी तरी रहात होतेच की. एकही व्यक्ती इमारतीत राहात नसला तरी चालेल, इमारत नाही तरी तिचे अवषेश जतन केलेच पाहिजेत. तसेच अक्षरांचे पण. मला वाटते ञ ऌ वगैरे अक्षरे भारतीय पुरातत्व विभागा (Archeological Survey of India ) कडे सुपुर्द करावीत, म्हणजे त्यांना कायद्याचे संरक्षण मिळेल व कोणी त्यांना बाद करण्याची भाषा करणार नाही.