कृ हे जोडाक्षर नाही, त्यामुळे सकृत शब्द उच्चारताना 'स'वर जोर येत नाही; कवितेमध्ये हा शब्द आल्यास 'स'ची मात्रा एक समजली जाते, अर्थात ते अक्षर उच्चारायला एक एकक वेळ लागतो.
याउलट, क्रु-क्रू ही जोडाक्षरे आहेत. 'स'क्रुत म्हणताना 'स'वर आघात द्यावा लागतो, अर्थात 'स'या मात्रा दोन होतात; उच्चारायला अर्थात दोन एकक वेळ लागतो.
अक्रूरा नेऊ नको मथुरेला
या ओळीत अक्रूरा हा सहामात्री शब्द आहे. 'अ'वर आघात येत असल्याने त्याच्या दोन मात्रा होतात. जर क्रूच्या जागी कृ असता , तर 'अ'ची एक मात्रा मोजली गेली असती. हे मात्रांचे बंधन पाळले नाही तर सुमधुर चालीची कविता बनणार नाही.
निदान कवितेच्या माधुर्यासाठी तरी, कृ टिकला पाहिजे.