कृ चा उच्चार क्रि आणि क्रु ह्या दोन्हीच्या मध्ये आहे . . . . शिक्षकांनी तो उच्चार आम्हाला नीट शिकवलेला आहे.

आणी तुमच्या शिक्षकांना तो कोणी शिकविला? त्यांच्या शिक्षकांनी.   आणी त्यांना तो कोणी शिकविला? त्यांच्या शिक्षकांनी.   आणी त्यांना तो . . . .

काय आहे महेशजी, कि जे काही श्राव्य ते ध्वनी मुद्रणाच्या साह्यानेच एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत बरोबर पोहोचू शकते. पण ध्वनी मुद्रणाचे तंत्रज्ञान अगदी अलिकडचे. त्या आधी काय ? विचार लिहून जतन करता येतात. उच्चार असे जतन करता येत नाहीत. उच्चार गुरुमुखेच  एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहोचताना त्यात प्रत्येक टप्प्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. आणि एकदा बदल झाला की त्याचे पूर्वीचे  स्वरूप कसे होते या बद्दल आपण काहीही अंदज करू शकत नाही.  तुम्ही उत्तर हिंदुस्तानातील शाळांत गेलात तर तिथे तुम्हाला कृ चे वेगळे उच्चार सापडू शकतात, व बरोबर उच्चार काय हे तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने सांगितले तेवढ्याच आत्मविश्वासाने ते पण त्यांचा उच्चार बरोबर असे सांगतील. तुमचाच उच्चार बरोबर असे मानण्याला काहीही आधार नाही.

आता निदान कवितेच्या माधुर्यासाठी तरी, कृ टिकला पाहिजे असे असेल तर खुश्शाल टिकवा. माझी व्यक्तिशः काहीही तक्रार नाही. मी फार नशीबवान आहे. मला फक्त स्वर समजतात, शब्द समजतच नाहीत. मानसी राजहंस पोहतो. नील जलावर धवल विहग तो हे गाणे काही गायक
मानसी राजहंस पोहतो. नील जलावर धवलवि हगतो असे गातात. यात काही तरी चूक आहे हे एकदा वसंतराव देशपांडे यांनी एका lecture demonstration मध्ये फोड करून संगितले तेव्हां कुठे माझ्या ध्यानात आले. आमची कवितेची समज झांझरवा झनकत असतो, सांस ननदिया ऐकत असते, सौतन संग रैन बिताऊन आलेला पिया ते समझत नसतो, नींद बैरन असते, वगैरेच्या पलिकडे जात नाही.