मी : उच्चार . . . प्रत्येक टप्प्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.
तुम्ही : या पद्धतीमुळे मूळ उच्चार टिकून राहिले असण्याची दाट शक्यता आहे.
हे दोन्ही विचार एकच आहेत.
मराठी व संस्कृत भाषा हे माझे विषय नाहीत, पण संगीत या विषयाचा माझा काही अभ्यास आहे. पाश्चात्यांचा दृष्टीकोण वैज्ञानिक असल्याने त्यांनी Tuning Fork चा शोध लागल्या वर स्वरांचे स्थान निश्चित करण्या करता ट्यूनिंग फोर्क चा वापर सुरु केला. पियानो ट्यून करणारा प्रत्येक स्वरा करता एक, असा ट्यूनिंग फोर्क चा सेट बरोबर आणत असे व त्या आधारे पियानो ट्यून करीत असे. आपल्याला एकूणच विज्ञानाचे वावडे, व "बाबा वाक्यं प्रमाणाम" कडे कल. त्यामुळे आपल्या कडे स्वरांचे स्थान गुरु सांगेल ते. भातखंडे यांनी पहिल्यांदा एका निश्चित लांबीच्या तारे वर प्रत्येक स्वराचे स्थान अमूक इतक्या इंच ठिकाणी दाबल्यास, असे निश्चित करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या संगीतात कोणत्याच स्वराचे स्थान स्थिर नसल्याने (प्रत्येकाला आपल्या सोयी प्रमाणे आपली पट्टी ठरवता येते) याचा फारसा फायदा झाला नाही .
अनेक गायक "आमचा षडज म्हणजे कसा, एकदम शुद्ध व स्थिर" वगैरे वल्गना करीत असत, अजून ही करतात. डिजिटल तंत्रज्ञान आल्या नंतर काहींच्या स्वरांचा frequency meter इत्यादींच्या साह्याने अभ्यास करण्यात आला व असे लक्षात आले कि "एकदम शुद्ध व स्थिर" वगैरे सर्व मनाचे खेळ होते. स्वर पुढे मागे आंदोलित होत होते, पण कानांना ते फरक कळत नव्हते, इतकेच. उच्चारांच्या बाबतीत स्थिती वेगळी असण्याचे कारण नाही. संस्कृतमध्ये अ-इ-उ-ऋ या स्वरांचे प्रत्येका अठरा उच्चार आहेत, आणि बाकीच्या स्वरांचे प्रत्येकी बारा या वर विश्वास ठेवणे तर कठीण आहेच, पण जर हे खरे मानले तर देवनागरी फोनेटिक लिपी आहे या claim चा पार बोज्या उडतो.
कोणत्याही आवाजाचा ग्राफ oscilloscope वर पाहता येतो. मला गळ्यातून 'अ' चे अठरा स्वर काढता येतात असे म्हणणार्या कोणाकडून ही कोणताही एक उच्चार अनेकदा करून त्याचा ग्राफ oscilloscope वर तसाच येतो का, हे संशोधन करून पहायला हवे. अन्यथा हे निव्वळ "झाकली मूठ अठरा स्वरांची" म्हणावे लागेल.