खरे तर असे संशोधन व्हावेच.  उच्चारांचे स्वनीय (स्वानिक? ) मापन आणि लेखन अथवा मुद्रण होऊ शकेल.
अवांतर : ध्वनीसाठी 'स्वन' हा शब्द मला अधिक आवडतो.  'स्वनातीत' हा  'सुपर-सॉनिक'  या इंग्लिश शब्दासाठी अगदी चपखल प्रतिशब्द वाटतो. 'अल्ट्रासाउंड' साठी सुद्धा हा चालू शकेल का? सोनोग्राफीसाठी स्वनालेखन वगैरे ....
साउंड आणि स्वन यातील साम्यही लक्षणीय आहेच.