यांत्रिकरीत्या अक्षरांचे उच्चार 'बनवून' ते करणे आता शक्य आहे. हे करण्याच्या अनेक शक्यता दिसत आहेत. प्रशासन वेळेच्या उपलब्धतेनुसार ह्या शक्यतांचा विचार करून मराठी मजकुराच्या यांत्रिक वाचनासाठी काही सुविधा निर्माण करता येईल का, ह्याचा विचार करत आहे.

अशी सुविधा झाली तर/की तिच्याद्वारे संदर्भाचे स्वर जतन करून ठेवता येतील आणि पुढच्या पिढ्यांसाठी प्रमाण म्हणून राहतील असे वाटते.

अशी एक सुविधा पडताळून पाहताना एक गोष्ट लक्षात आली. मराठीत च चे दोन उच्चार शक्य आहेत. कोठला च कधी त्यासाठी काही सोपा आडाखा मिळतो का हे पाहणे अतिशय उपयुक्त ठरेल. असा काही 'नीतीनियम' असेल असे म्हणायचे नाही; मात्र निरीक्षणाने काही 'रीतिनियम' सापडतो का पाहावा लागेल, असे वाटते. अन्यथा च च्या उच्चाराची अंमलबजावणी (दुर्दैवाने) अशा च च्या शब्दांच्या यादीद्वारेच हाताळणे शक्य होईल असे वाटते.