यांत्रिकरीत्या अक्षरांचे उच्चार 'बनवून' . . . . तर/की तिच्याद्वारे संदर्भाचे स्वर जतन करून ठेवता येतील

१:  आधी हे लक्ष्यात घ्यावे कि उच्चार अक्षरांचे  नसतात. उच्चार शब्दांचे असतात. कोणतीही लिपी १००% फोनेटिक नाही. रोमन तर अगदीच कमी फोनेटिक आहे.  car या शब्दाच्या अक्षरांचा  उच्चार केल्यास 'सीएआर' असा उच्चार होईल, कार असा होणार नाही. देवनागरी त्या मानाने खूपच जास्त फोनेटिक आहे. तरी कार या शब्दाचा अक्षरोच्चार  'का'  'र'  असा (सुटी सुटी  अक्षरे) असा होईल, काऽर्  असा होणार नाही.
२:  यांत्रिकरीत्या उच्चार (स्पीच सिंथेसिस) करण्याच्या तीन  पद्धती आहेत. त्या येथे समजावून सांगणे शक्य नाही कारण ते फारच टेक्निकल होईल, पण कोणत्याही पद्धतीत उच्चार मनुष्यच ठरवीत असतो (programing). यंत्र फक्त ठरवून दिल्या प्रमाणे उच्चार करीत असते.
३:  उच्चार जतन करून ठेवण्या साठी इतक्या किल्ष्ट टेक्नोलोजी ची गरज नाही. साधे ध्वनी मुद्रण केले तरी हेतू साध्य होइल.
४: पहिला मुद्दा असा आहे  कि 'अ' या स्वराचे खरोखर कानांना फरक जाणवेल असे अठरा वेगळे उच्चार आहेत, का हे केवळ "आमच्या खापर पणजीला बटाट्याच्याच शंभर प्रकारच्या भाज्या करता येत असत" असा प्रकार आहे. कारण संस्कृतमध्ये अ-इ-उ-ऋ या स्वरांचे प्रत्येका अठरा उच्चार आहेत, आणि बाकीच्या स्वरांचे प्रत्येकी बारा हे मान्य केले तर एकून स्वर शंभराच्या जवळ पास जातील. हे  शक्य कोटीतले वाटत नाही.
हे सगळे उच्चार सांगणारा कोणी माहीत असेल तर मी स्वखर्चाने त्याच्या कडे जाऊन ते ऐकण्यास, ध्वनी मुद्रित करण्यास तयार आहे.
५: दुसरा मुद्दा असा आहे कि जर एकाच चिन्हाचे एकापेक्षा जास्त उच्चार असले, केवळ दोन जरी असले, तर त्याने लिपी अ-फोनेटिक होते. तेव्हां एकूण स्वरोच्चार जेवढे असतील, तेवढी चिन्हे असवीत. नसतील तर नवीन चिन्हे जन्माला घालावीत.