डॉ. धनंजय वैद्य हे जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठात जीव-वैद्यकीचे प्राध्यापक आहेत. संस्कृतचे गाढे विद्वान आहेत. उपक्रम, मिसळपाव यांसारख्या अनेकानेक मराठी आणि अनेक संस्कृत संकेतस्थळांवर त्यांचे डीजे, किंवा धनंजय या नावाने केलेले शेकडो पाने भरून लिखाण सापडते. मनोगतावर त्यांचे बहुधा डीजे हे नाव असावे. संस्कृत भाषा, संस्कृत उच्चार, संस्कृत वाङ्मय यांसंबंधी त्यांनी केलेले, आणि ते करीत असलेले आधुनिक संशोधन अभूतपूर्व आहे.
धनंजय वैद्यांचे संस्कृतसंबंधी अनेक ब्लॉग आहेत. पूर्वी मला बरेच माहीत होते, आताही शोधले की सापडतीलही. पण रेकॉर्ड ठेवले नसल्याने सहजासहजी सापडत नाहीत. मोठ्या प्रयत्नाने एक सापडला. त्यावर धनंजयांनी संस्कृत अक्षरांचे शास्त्री-पंडितांकडून वदवून घेतलेले उच्चार ध्वनिमुद्रित केले आहेत. मी ते पूर्वी ऐकले आहेत; पण दुर्दैवाने माझ्या सध्याच्या संगणकावर जरूर ती व्हॉइस सुविधा नसल्याने मला ते उच्चार यावेळी तरी ऐकणे शक्य होत नाही आहे .
मनोगताच्या अन्य सदस्यांकडे योग्य ती सुविधा असल्यास त्यांनी या उच्चारांचे पॉडकास्ट जरूर ऐकावेत. . दुवा क्र. १ येथे ते ऐकता येतील. ऋ आणि .ऌ यांचे उच्चारही तेथे असल्याचे आठवते.