आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये एक आदिवासी कुटुंब रहायचे. आमच्या घराचा दरवाजा उघडा दिसला की त्या ब्लॉकमधली दोन वर्षाची मुलगी आमच्या घरात घुसायची आणि खूप धुडगूस घालायची. तशी तिला मोकळीकच होती. एकदा आली, थोडीशी खेळली आणि माझी षुषी कुठे आहे म्हणून विचारू लागली. 'षुषी'तल्या 'ष'चा उच्चार अगदी स्पष्ट. तिला उशी दाखवली, बशी दाखवली, एक ऋषीचा पुतळा दाखवला, पण तिचे समाधान होई ना. शेवटी तिला घराच्या गच्चीवर गंमत दाखविण्याच्यी मिषाने नेले. तिथे आमची लाकडी खुर्ची दिसल्याबरोब्बर ती उद्गारली, ."ही पाहा माझी षुषी!"
आदिवासी घरातून आलेली दोन वर्षाची मुलगी 'ष'चा उच्चार इतका स्पष्ट करत होती, ते पाहून वाटले, "कोण म्हणते मराठीतून 'ष' हद्दपार झाला आहे म्हणून? ".... अद्वैतुल्लाखान