तिथे आमची लाकडी खुर्ची दिसल्या बरोब्बर ती उद्गारली, "ही पाहा माझी षुषी!"  आदिवासी घरातून आलेली दोन वर्षाची मुलगी 'ष'चा उच्चार इतका स्पष्ट करत होती,
षाष षाष. म्हणजे फार छान. जर 'षु' हा 'खु' चा स्पष्ट उच्चार असू शकतो, व 'षी' हा 'र्ची' चा स्पष्ट उच्चार असू शकतो, तर 'षा' हा 'फा' चा; व 'ष' हा 'र' चा स्पष्ट उच्चार नक्कीच असू शकतो. तर, पहिले षाष म्हणजे फार, व दुसरे षाष म्हणजे छान. भाषेतील अडगळ दूर करण्या बाबतचे माझे सर्व शेरे तर मी मागे घेतोच, पण आमच्या शेजार्यांचे पाच महिन्याचे बाळ अनेक "उच्चार" स्पष्ट करते ज्यांच्या करता देवनागरीत चिन्हेच नाहीत. तर त्या करता नवीन चिन्हे बनवावीत असा प्रस्ताव मांडतो.