परदेशात शिक्षण खुपच महागडे आहे त्याही पेक्षा तेथिल कोलेज शिक्षण हे मुले स्वतः अर्धवेळ नोकरी करून मिळवितात. परदेशात १२ वर्षाचा मुलगा आई - वडिलाना पोकेट मनी बद्दल कोर्टात खेचू शकतो पण तोच मुलगा १८ चा झाला कि स्वतःच्या शैक्षणिक कर्जाच्या आधारे शिक्षण पुरे करतो. म्हणून स्थानिक तरुण (परदेशी) अधिक पगाराची अपेक्षा ठेवतात परिणामी भारतीय मुलाना अधिक प्रमाणात नोकर्या मिळू लागल्या. पण त्यातिल मुळातिल ग्यानबाची मेख अजून लक्षात आली नाहि. ज्या शिक्षणाच्या आधारे मुले परदेशात नोकरी करण्यास जातात त्यासाठी त्यानी काय केले आहे?
एकतर शैक्षणिक कर्जे घेनुनच मुलानी शिकावे व शिक्षण पुर्ण झाल्यावर मुलानीच ते परत फेडावे. म्हणजे आप कमाई वरच शिक्षण करावे मग देशात परदेशात कुठेही नोकरी साठी जाण्यास मोकळे.
म्हातारपणाची जबाबदारी ज्याची त्याची स्वतःची आहे. तरुण वयातच म्हातारपणाची तजवीज करून ठेवण्यात शहाणपण आहे.