प्रतिसादाबद्दल आभार.
विषाद ह्या शब्दापासून वैषम्य हा शब्द कसा काय तयार होईल? विषमपासून वैषम्य, विशिष्टपासून वैशिष्ट्य, विफलपासून वैफल्य असे शब्द तयार होतात. विषादपासून शब्द केलाच तर तो वैषाद्य असा होईल. पण त्याचा अर्थ काय? वर उल्लेखिलेले शब्द हे विशेषणापासून झालेली भाववाचक नामे आहेत. विषाद हेच भाववाचक नाम आहे. तर वैषाद्य म्हणजे काय?
निर्भरबद्दल आपण सांगितले आहे ते बरोबर आहे. संस्कृतमधील निर्भर शब्द मराठीत सामासिक शब्दात आढळून येतो. पण मी जी उदाहरणे दिली आहेत तसा अर्थ (अधिकृत) कोणाला माहीत आहे का?