तुम्ही म्हणतात ते थोडे बरोबर आहे, परंतु वैषम्य हा शब्द विषम यासाठीच वापरतात. त्याचा अर्थ दुःख असा होत नाही. वैषम्य किंवा विषम याचा अर्थ वेगळा (भाववाचक) असा होतो. "मला तो विषम वाटला." याचा अर्थ मला तो मी केलेल्या अपेक्षेपेक्षा वेगळा वाटला. असाच होतो. (संदर्भः बृहःदमूलमराठीशब्दकोष पान क्र. ३६७ )
   निर्भर:= माझ्या माहितीप्रमाणे "भार " या मूळ संस्कृत शब्दापासूनच तयार झाला आहे. हा त्याचा विरूद्ध अर्थी शब्द निर्भर म्हणजे ज्याला भार नाही असा तो असा सामासिक शब्दात येतो. "भाववाचक मूलसुत्री"नुसार  निर्भर हे भार या मूल धातू चेच रूप आहे. निर्भर चा अर्थ अवलंबून असणे असा होणे (सांप्रत मराठी) येथे अभिप्रेत आहे.

@ प्रा. धीरज गौतमे.