आपण प्रयत्न आवश्यक तितका केला, आपली योग्यता आवश्यक तितकी आहे, आपण आवश्यक त्या सर्व अटी पाळल्या, आपल्याकडे आवश्यक तितके संसाधन आहे, आपण आवश्यक तितकी गुंतवणूक केली ... तरीही आपल्याला मिळणारे फळ हे जितके/जसे मिळायला हवे तितके/तसे मिळालेले नाही, ह्या जाणिवेतून/भावनेतून जे दुःख होत असेल त्या दुःखाचे कारण "वैषम्य" असे शोधले जात असावे. त्यामुळे "मला वैषम्याचे - वैषम्यातून आलेले दुःख वाटते" असे संपूर्ण म्हणण्याऐवजी आपण "मला वैषम्य वाटते" इतकेच म्हणत असू, असे मला वाटते.