मराठीतही विषाद हा शब्द वापरतात आणि तो दुःख ह्या अर्थानेच वापरतात. कारण मूळ संस्कृत शब्दाचा तोच अर्थ आहे. परंतु वैष्यम्य आणि विषाद ह्या दोन शब्दांमध्ये थोड्या ध्वनिसाधर्म्याखेरीज आणखी काही साम्य आहे असे मला वाटत नाही.