एकदा एक व्यक्ती निवडणुकीत हरली म्हणजे जनतेने ती नाकारलेली आहे
असे असेल, तर समजा एक व्यक्ती दोन मतदार संघातून उभी राहीली व एका ठिकाणी
जिंकली व एका ठिकाणी हरली तर त्याचा काय अर्थ
काढाल? जनतेने त्या व्यक्तीला नाकारले का साकारले?
हा वैचरिक घोळ होण्याचे कारण असे कि एकदा एक व्यक्ती निवडणुकीत हरली म्हणजे जनतेने ती नाकारलेली आहे. ही तुमची समजूत मुळात चुकिची आहे. निवडणूक पद्धतीत कोणाही उम्मेदवाराला नाकारण्याची कोणतीही सोयच नसते. "अमूक एक उमेदवार मला नको" असे सांगण्याची कोणतीही सोय मतदान प्रक्रियेत नसते. ("नोटा" म्हणजे या पैकी कोणीच नको ही सोय आत्ताच झाली, पण यातही सगळ्यांनाच सरसकट नाकारले जाते. अमूक एकाला नाही) तुम्ही 'अ' या उमेदवाराला मत दिले तर याच अर्थ तुम्ही 'ब' 'क' 'ड' यांना नाकारले असा अजिबात होत नाही. याचा अर्थ येवढाच होतो कि तुम्ही ब, क, ड, यांच्या पेक्षा 'अ' याला अग्रक्रम दिलात. 'अ' निवडणूकीस उभाच नसता तरी तुम्ही 'ब', 'क', 'ड' यांना मत दिलेच नसते असे म्हणता येत नाही. निवडणूक ही एक शर्यत असते, व निवडणूक हरणे म्हणजे अमूक दिवशी अमूक ठिकाणी झालेली एक शर्यत हरणे येवढाच त्याचा अर्थ असतो. शर्यतीत पुन्हा भाग घेण्यास कोणतीही आडकाठी नाही.