इथे मनोगतावर बाकीच्यांशी वाद घालण्यात ऊर्जा खर्च करू नका.
कुणाची ऊर्जा खर्च करू नका ? माझी, का इतरांची ? माझ्या ऊर्जा-खर्चाची काळजी इतरांनी करू नये. व इतरांची ऊर्जा मी खर्च करीत नाही. माझे प्रतिसाद वाचण्याची कोणावर ही सक्ती नाही. वाचणारे स्वखुषीने वाचतात. त्यातून, चर्चा करण्या करता (याला काही लोक वाद घालण्या करता असे पण म्हणतात) मंच, हा मनोगतच्या उद्दिष्टां पैकी असणार, असे मला वाटते.
बालकः लड्डुकं खादति। नृपः सिंहासने उपविशति। वगैरे. तुम्ही तीनच शब्दांची वाक्ये निवडली आहेत. मी आंघोळ केली; आंघोळ मी केली; केली मी आंघोळ; केली आंघोळ मी; वगैरेचे पण अर्थ तेच होतात. पण ते जाऊ दे. आदर्श भाषा कशी असावी ? शब्दांच्या sequence ला महत्त्व असावे, का नसावे ? का असावे ? किंवा का नसावे ?