महोदय,
आपल्या सुचनांचे पालन केल्यास मराठीतले बरेच शब्द बादच करावे लागतील. संदर्भ शोध्ल्यास बरीच उदाहरणे सापडतील.  अनेक शब्द तर असे आहेत की त्यात फक्त र्हस्व दीर्घाचाच फरक आहे. तेहा इकार, उकारातील र्हस्व दीर्घ जर काढून टाकले, तर अशा सर्व शब्दांत काही फरक उरणार नाही.   तिच गोष्ट अकार-आकाराची. इंग्रजीतील ऍ / ऑ या उच्चारांचे अचुक अनुकरण करण्यासाठीच ही अक्षरं काढली गेली. बेंक किंवा ब्यांक आणि बँक या पैकी  कुठला उच्चार मूळाबरहुकुम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. टॅन (गणितातला) आणि टेन, बॅन आणि बेन यामुळे होणारे गुजराथी विनोद तर सर्वांना माहीतच आहेत. बाँब म्हटलं काय किंवा बोंब म्हटल काय, काय फरक पडतो अस म्हणायच झाल तर मग एकुणच अर्थाची बोंबच आहे. सगळीकडेच बाँबाबाँब !! व्यंजनांमध्ये तर कडू-खडू, गरगर-घरघर, जगा-झगा, ओल-ओळ अशी अर्थाचा अनर्थ करणारी अगणित उदाहरणे देता येतील. तामिळ भाषेत तर ल, ळ सोडून आणखी एक जड ळ देखील आहे. ही सर्व प्रत्येक भाषेची आपापली वैशिष्ट्य आहेत. त्या शिवाय वेगवेगळ्या ध्वनींमुळे / अक्षरांमुळे भाषा अर्थाच्या आणि सामर्थ्यच्या (केपेबिलिटी) दृष्टीने अधिक शक्तीमान किंवा पॉवरफुल होते असं म्हणायला हरकत नाही. संकृत संगणकासाठी सर्वात चांगली नैसर्गिक भाषा (नॅचरल लँग्वेज) आहे असं म्हणंण्याचं कारण म्हणजे त्यात अँबिग्युइटी (? ) कमीत कमी आहे, आणि याच कारण संस्कृतच व्याकरण तसच तिची विस्तृत अक्षरमाला, अर्थात अल्फाबेट. 

थोडक्यात, ही सर्व अक्षरे कशला ? अमुक भाषेत कुठे हे अक्षर आह, मग मराठीत कशाला हवं, या किंवा अशा प्रकारच्या  युक्तीवादाने बंडखोरी सिद्ध करता येईल, पण त्या व्यतिरिक्त त्याला फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. या सर्व भाषा वेगवेगळ्या आहेत, आणि त्या तशा आहेत म्हणूनच त्या तशा वापरल्या जातात या पलीकडे त्याला कारणमिमांसा नाही. या बाबत बरच विस्तृत विवेचन करता येईल, पण थोडक्यात सांगायचं तर, भाषाशास्त्रात 'लँग्वेज इज नॉट प्रिस्क्रिप्टिव्ह, बट डिस्क्रिप्टिव्ह' अस एक सर्वमान्य सुत्र आहे. म्हणजे भाषाशास्त्र भाषा कशी असावी याच विवेचन करत नाही, तर ती कशी आहे याचं वर्णन करते. आणि ते तसच असाव हा सिद्धांत आज तरी बहूतांशी मान्य केला जातो. 

तस म्हटल तर मग वेगवेगळ्या भाषा तरी कशाला हव्यात, सर्वांनी इंग्रजी वापरलं तर काय फरक पडेल,  उलट सोपच होईल असं म्हणणारा एक वर्ग भारतातच नाही तर अन्यत्र देखील होता व अजूनही  आहे देखील. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या भाषा म्हणजे केवळ वेगवेगळ्या कोड सिस्टीम्स नसून, त्यांच्याशी संस्कृती जोडल्या गेल्या आहेत, आणि म्ह्णूनच विविध भाषा जगल्या पाहीजेत आणि तगल्या पाहीजेत, असे मानणाराही एक फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे.

तेव्हा, जी आहेत ती सर्व - निदान बहुतांशी सर्व अक्षरं असावीतच, असं माझं तरी मत आहे.