सर्वांनी सुचवलेल्या शब्दांबद्दल धन्यवाद. 

पण खरे आहे, वर सुचवलेल्यापैकी कोणताच शब्द 'तावातावाने' या शब्दाचं सार किंवा त्याचा भाव तेवढासा अचूकपणे व्यक्त करू शकत नाही. कदाचित इंग्रजीत या शब्दाला एग्झॅक्ट असा प्रतिश्ब्द नसेलही. पण याचा अर्थ इंग्लिश लोकं तावातावाने बोलतच नाहीत की काय? बोलत असतील, तर ते व्यक्त करणारा शब्दही असायला हवा. 

ते  काहीही असलं तरी, 'टॉक तावतावली' हा शब्दप्रयोग - माफ करा - पण थोडासा... गावठी वाटतो. यात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही, कृपया राग मानू नये. पण हा पर्याय तेवढासा प्रशस्त वाटतं नाही हे खरं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, आपण जेव्हा इंग्लिशमध्ये लिहितो, तेव्हा ते इंग्लिश भाषा येणाऱ्या कुणालाही समजावं यासाठी लिहितो. पण 'टॉक तावतावली ' हे फक्त मराठी भाषा येणाऱ्यांनाच समजू शकेल. पुढे मागे जर हा शब्दप्रयोग इंग्लिशमध्ये स्वीकारला गेला, आणि बऱ्याच लोकांना माहित झाला, तर गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तरी हा पर्याय व्यावहारिक होऊ शकत नाही. 

पण या निमिताने, आपण सर्वांनी विचाराला चालना दिली, आणि विचारांचा उहापोह केला हेही नसे थोडके. हा धागा, अर्थात थ्रेड, असाच चालू (लाइव्ह) राहावा, आणि इतर कुणालाही आणखी काही पर्याय सुचल्यास जरूर कळवावे ही विनंती. 

टिल देन, ईट मराठी, ड्रिंक मराठी, स्पीक मरठी, स्लीप मराठी !!