बऱ्याच वेळा अधुनिक शास्त्रांचा विचार करताना आपण भारतात आणि युरोपव्यतिरिक्त इतर  ठिकाणी झालेल्या संशोधनाकडे कानाडोळा करतो...  आता फिबोनाची श्रेणीचेच घ्या ना... ह्या श्रेणीबाबतचा पहिला विचार इ.वि. पूर्व ५०० मध्ये पिंगल ह्याने केला होता... एवढेच नव्हे तर त्याच्या छंद-शास्त्र ह्या ग्रंथात बायनरी संख्या पद्धती आणि पास्कल ट्रॅगल (मेरुप्रस्तार) ह्यांचाही उहापोह केलेला आहे.
पिंगल हा सुप्रसिद्ध संस्कृत व्याकरण पंडित पणिनीचा लहान भाऊ आहे असे भारतातील लोक समजतात, तर अधुनिक संशोधकांच्या मते तो पणिनीच्या २०० वर्षे नंतर झाला...


भारतात प्राचीन काळापासून झालेल्या थोर शास्त्रज्ञांबाबतचे अज्ञान पाहून खूप वैशम्य वाटते...

असो...